Tuesday, April 10, 2007

असं का

तुझ्या घरावर कोसळणारा पाऊस माझ्याशी असं का वागतो ?
नुसतं बरसून जाण्यासाठी सुद्धा आसवांची व्हिजिटिंग फ़ी मागतो...

तुझ्या दाराशी रेंगाळणारा वारा माझ्याशी असं का वागतो ?
तुझ्या केसातला मोगराच त्याला नेहमी का लागतो ?

तुझ्या अंगणातला चंद्र माझ्याशी असं का वागतो ?
चांदण्याने जग न्हाताना माझ्या अंगणात काळोख दाटतो .

तुझ्या ओसरीवरचा कंदील तेवढा माझ्याशी ईमान राखतो .
रात संपेपर्यंत मी आणि वात संपेपर्यंत तो जागतो ...

केवळ तू

प्रभाती फ़ुले गोळा करण्या
बागेत फ़िरती आहेस अनवाणी
काटा रुतेल पहा पायी
आजतर पायात पादत्राणंही नाही

तू पाऊलवाटेवरुन जाताना
घायाळ सारे, वाचणार आहे का कुणी?
तू अशी अनिर्बंध स्वच्छंदी
आजतर डोईवर तुझ्या पदरही नाही

ग्रासला जाणार आज बहूतेक
भरदिवसा आकाशीचा पुर्ण-चंद्र अवेळी
आजतर तुझे काळेभोर
लांबसडक केसही निट बांधलेले नाही

कुणीतरी नक्की पडणार
तुझ्या शरसंधानाने धारातिर्थी
नुकतीच न्हालेली तू
अजून मृगनयनी काजळही नाही

सुरेल तुझं गुणगुणनं
तुला त्या सतारीचीही गरज नाही
थिरकणंही तुझं लयबध्द
पायीच्या पैंजणांची देखील फ़िकिर नाही

स्वर्गीय अप्सरेलाही लाजवेलसं तुझं सौंदर्य,
स्वच्छ नितळं आरस्पानी
मी बापडा त्याचं काय वर्णन करु
तुला हातच्या काकणांचीही गरज नाही

करु नकोस पण मला
बदनाम अशी सकाळी सकाळी
इतकी का तू निष्ठूर निर्दयी
तुला या वेड्याची करुणाही येत नाही

जळतात सारेच मग
विनाकारण माझ्या गुमनाम नावी
कुठं जरासं ते बेइमान
तुझ्या नावाशी जोडलं जात नाही.

व्हेलेंटाईन

व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? (new )( तो हातात गुलाब घेवून, चेहर्यावर क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो ) पुढे...
तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन?
ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन.
तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस ,खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम करतेस ?
ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते ?माझे तूझ्यावर प्रेम असते तर , तुला जायला सांगीतले नसते
तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस,ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते ,तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येतेतो - मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस?सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती - मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटतेम्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते
तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही ,आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही
ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला,पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा, आज वेळ कसा वाया गेला?
तो - (खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून)ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहेया प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहेआज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणारएक- दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणारह्या दिवसाचा एक=एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे, तूझं माझ्यावर प्रेम आहे का? या सर्वांना विचारायचं आहे
ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल ,जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल
(दोघे ही आप-आपल्या मार्गाने जावू लागतात . इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच असतो. खुप राग आला असताना ही ती नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो. ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे...
ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे.मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेसमी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं आहे.(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो.. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो..व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो .
ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते...व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन?)